Vidhan Sabha 2019 : पुण्यात युतीचे पाच तर आघाडीचे तीन बंडखोर मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्यांनी कॅंटोन्मेंट, पर्वती, कसबा, वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे चार, कॉंग्रेसचे तीन, तर, भाजपच्या एका बंडखोराचा त्यात समावेश आहे.

पुणे : विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्यांनी कॅंटोन्मेंट, पर्वती, कसबा, वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे चार, कॉंग्रेसचे तीन, तर, भाजपच्या एका बंडखोराचा त्यात समावेश आहे.

आता पुढील तीन दिवसांत काय घडामोडी घडतील, यावर या बंडखोरांचे भवितव्य ठरेल. बंडखोरीची सर्वाधिक लागण कॅंटोन्मेंट मतदारसंघात झाली आहे. 

पाच विधानसभा मतदारसंघात नगरसेवक, माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज सोमवारी (ता. 7) मागे घेता येणार आहेत.

कॅंटोन्मेंट : पल्लवी जावळे (शिवसेना), सदानंद शेट्टी (कॉंग्रेस), डॉ. भरत वैरागे (भाजप) 
कसबा : विशाल धनवडे (शिवसेना), कमल व्यवहारे (कॉंग्रेस) 
पर्वती : आबा बागूल (कॉंग्रेस) 
वडगाव शेरी : संजय भोसले (शिवसेना)
खडकवासला : रमेश कोंडे (शिवसेना)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena four Congress three and one bjp rebels in Pune election