शिवसेनेने खेडच्या तहसीलदारांकडे केल्या या मागण्या; वाचा सविस्तर

Shivsena
Shivsena

राजगुरुनगर - तालुक्यात कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिले घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी, रुग्णांचे स्वॅब तापसणीसाठी मोठा कालावधी लागत असल्यामुळे होणारा कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणावा, बेड मिळवण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रशासनाने अधिक नियोजन करावे, इत्यादी मागण्या शिवसेनेच्यावतीने खेडच्या तहसीलदारांकडे करण्यात आल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या वाढत चालल्याने, माजी आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले आणि कोरोनासंदर्भात लोकांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. तालुकाप्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, उपसभापती ज्योती अरगडे, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्य वैशाली जाधव, भगवान पोखरकर, सुरेश चव्हाण, संजय घनवट, नंदा कड, दिलीप तापकीर, एल बी तनपुरे, सुनील टाकळकर, महेंद्र घोलप आदी यावेळी उपस्थित होते.

लोकांना स्वॅब देण्याची आणि रुग्णालयात दाखल होण्याची प्रक्रियाच माहित नसल्याने त्यांचे हाल होतात. स्वॅब घेण्यास लवकर नंबर लागत नाही. स्वॅब दिल्यानंतर त्याचे अहवाल येण्यास उशीर लागतो. या प्रक्रियांमध्ये चार पाच दिवस जातात आणि पॉझिटिव्ह रुग्ण गंभीर होतो, तसेच तो इतरांना संसर्ग करतो. सरकारी पातळीवर परिस्थिती नीट हाताळली जात नसल्याने लोकांना खासगी रुग्णालयात जावे लागते. खासगी रुग्णालयात संशयास्पद कारभार चालतो. रुग्णाला नातेवाईकांना भेटू दिले जात नाही. शासनाने ठरवून देऊनही भरमसाट बिले आकारली जातात, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. 

कोरोना रुग्णालयाबाबतची माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहचवावी. माहितीफलक लावावेत. गंभीर रुग्णांना शहरांमधील रुग्णालयांत बेड मिळवून देण्यासाठी नियोजन करावे. कंपन्यामध्ये काळजी घेत जात नसल्याने संसर्ग वाढत आहे, म्हणून अशा कंपन्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. तहसीलदार आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि सुधारणा करण्याची हमी दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com