esakal | ज्यांचा मुख्यमंत्री, त्याचेच सरकार - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

ज्यांचा मुख्यमंत्री, त्याचेच सरकार - संजय राऊत

ज्यांचा मुख्यमंत्री, त्याचेच सरकार - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालु असून, भविष्यात ते देशाचे नेतृत्व करतील. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले, तरी ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्याचेच सरकार आणि ते ठाकरे सरकार आहे. तीन वर्षे अजून बाकी आहेत. आपण जे गमावले, ते कमवा,’’ असे मत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. आळेफाटा (ता. जुन्नर) येथे जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी राऊत बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, ‘‘जुन्नरच्या शिवसैनिकांचे महाराष्ट्रात वेगळे मार्केट आहे, ते कमी होत नाही. राज्यात ५५ ठिकाणी भगवा फडकला, पण जुन्नरला फडकायला नाही, ती खंत आम्हाला आहे. शिवसेना हे एक मंदिर आहे. डोक्यात राग घालून जायचे आणि परत यायचे, असे करू नका. आपले एकच कुटुंब आहे. जो शिवसेनेतून गेला, तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो. जी बोचकी बाहेर गेली, ती परत आली तरी परत घ्यायची नाहीत.’’

हेही वाचा: केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 39 गोळ्यांचं दर केले कमी

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, ‘राज्यात जरी महाआघाडी असली, तरी येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार आहे. गेल्या दोन वर्षांत दहा ते बारा कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात विवीध कामांसाठी दिलेला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. वेळोवेळी कायदा आणि न्याय विभागाला सूचना देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी प्रयत्न करत आहोत.’’

हेही वाचा: जातीवादावरुन राष्ट्रवादीला राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं

माजी आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्यात बिबट सफारी केंद्र व दाऱ्या घाटाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. आढळराव पाटील यांचे उत्तम काम असूनदेखील एका अभिनेत्यासमोर एक उत्तम नेत्याला पराभवाला जावे लागले. आपल्या भांडणाने समोरच्यांचा फायदा होतो. जी माणसे समाजात वावरत नाही, ज्यांचे मोबाईल चोवीस तास बंद असतात, ते पुण्या-मुंबईला जाऊन राहतात आणि फिरायला जुन्नर तालुक्यात येतात. अशा लोकप्रतिनिधींना घरचा रस्ता दाखवा.’’

loading image
go to top