सत्ताधारी तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात - चित्रा वाघ

All three parties in power try to save the rapist allegations by Chitra Wagh
All three parties in power try to save the rapist allegations by Chitra Wagh

पुणे : "पुजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोग, राज्याचे पोलिस महासंचालकांना दिलेला चौकशी अहवाल हा वनमंत्री संजय राठोडच्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हा अपूर्ण अहवाल सादर करुन पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना टोपी घालण्याचे काम केले आहे. सत्तेत असणारे तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा पायंडा महाराष्ट्रसाठी घातक आहे," असा आरोप भाजपच्या महिला प्रदेश उपाध्याक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केला. तसेच वानवडी पोलिस निरीक्षक दीपक लगड हा अधिकारी रगेल असून महाराष्ट्र पोलिस दलाला लागलेला कलंक आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.

पूजा चव्हाण आत्महत्येच्या घटनेनंतर 18 दिवसांनी वाघ यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता घटना घडलेल्या वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीला भेट देऊन सदनिकेची पाहणी केली. तसेच त्यानंतर वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन राठोडसह महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.

पूजा चव्हाण मृत्यू : दोघं कुठं गेले? घटनेनंतर दिली होती कबुली; चित्रा वाघ यांचा खुलासा

वाघ म्हणाल्या, " पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड दोषी असून ते या आत्महत्यास जबाबदार आहे. 16 ते 17 दिवस मुंबईतुन केस आम्ही मॉनिटर करत होतो. घटना घडली तो फ्लॅट सील होता.तिने उडी  मारली की तिला मारण्यास लावली याबाबत स्पष्टता नाही. वानवडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहता केस दाबण्याचा ते प्रयत्न करत आहे. पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. पूजा सोबतचे राहणारे दोघे पोलीस ताब्यात नाही किंवा त्यांची चौकशी पुणे पोलिसांनी केली नाही. याप्रकरणी त्या दोघांची कस्टडी घ्यावी पोलिसांनी वाटले नाही, ते दोघे फरार आहे. पोलिसांनी या केस मध्ये काही करायचे नाही ठरवले आहे. मुंबई पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त संवेदनशील प्रकारे एखादे प्रकरण हाताळतात आणि वानवडी पोलीस निरीक्षक सांगतात आम्हला लेखी मुलीच्या पालकांची तक्रार नाही."

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com