Shivsena Latest News I पुण्यात सेनेला मोठं खिंडार, 5 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Latest political News frome pune

पुण्यात सेनेला मोठं खिंडार, 5 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार?

सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडींना वेग आला. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सेना नेते एकनाथ शिंदेंनी राज्याचे नवी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातीली शिवसेनेला खिंडार पडले असल्याची माहिती मिळत आहे. (Shivsena Latest political News frome pune

हेही वाचा: पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी; राऊतांचे ट्वीट

पुण्यातील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी नाना भानगिरे यांच्याकडे असणार आहे. याशिवाय २०१७ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले पुण्यातील ५ नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत भानगिरे यांनी हडपसर विधानसभा निवडणूक तीन वेळा लढवली आहे. याशिवाय पुणे महानगर पालिकेतून शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडुन आले आहेत.

भानगिरे यांची फोनवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून आज सायंकाळी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता पुण्यातही शिवसेनेत खिंडार पडले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. एकीकडे नाना भानगिरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात जात आहेत. तर दुसरीकडे २०१७ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले पुण्यातील ५ नगरसेवकही शिंदे यांच्या गटात सामिल होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढणार का? आणि शिवसेना यावर कोणती भूमिका घेणार पहावे लागणार आहे.

हेही वाचा: Mumbai Rain Alert: मुंबईत ऑरेंज अलर्ट, काय असतो नेमका अर्थ?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडानंतर भाजपशी हातमिळवणी करत राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर उद्बवलेल्या राजकीय स्थितीत त्यांच्या पाठिशी पुण्यातील शिवसेनेची ताकद किती होती हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पुण्यातील जवळचे असलेले हडपसर भागातील शिवसेनेचे जेष्ठ माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना शिंदे गटातून थेट मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: Shivsena Pune Nana Bhangire Enter In Cm Eknath Shinde Group Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..