व्हीप बजावला तरी अध्यक्षांची भूमिका महत्वाची - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

शिवसेनेचे बंडखोर आमदार सभागृहात आल्यानंतर त्यातील काही जणांचे मतपरिवर्तन होईल, असा विश्‍वास काही जणांना आहे, असे ऐकण्यात आले.

व्हीप बजावला तरी अध्यक्षांची भूमिका महत्वाची - शरद पवार

पुणे - शिवसेनेचे बंडखोर आमदार सभागृहात आल्यानंतर त्यातील काही जणांचे मतपरिवर्तन होईल, असा विश्‍वास काही जणांना आहे, असे ऐकण्यात आले. पण या शिवसेनेच्या आमदारांचा माझा वैयक्तीक संबंध नसल्याने ते नक्की काय करतील माहिती नाही.शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला असला तरी विधानसभेचे अध्यक्ष हे बंडखोरांच्या विचाराचे असल्यास व्हीप मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई कधी होईल हे सांगता येत नाही. यात अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेत नरहरी झिरवळ हे प्रभारी अध्यक्ष असले तरी दुसरे अध्यक्ष निवडले जातील. सभागृहात पक्षाने दिलेला व्हीप तो पाळावाच लागतो. पण पक्ष म्हणजे यामध्ये विधी मंडळातील एक पक्ष आणि दुसरा म्हणजे सभागृहाबाहेरील संघटना असते. सध्या तरी शिवसेनेची संघटना एका बाजूला आहे आणि विधीमंडळातील पक्ष दुसऱ्या बाजूला आहे. विधी मंडळातील शिवसेनेची संख्या पाहता, त्याकडे एकदम दुर्लक्षित करता येणार नाही. जर शिवसेनेच्या आमदारांनी व्हीप पाळला नाही तर त्यावर विधीमंडळाचे अध्यक्ष निर्णय घेतील पण ते कधी घेतली हे माहिती नाही. व्हीप मोडल्यानंतरही आमदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया मोठी आहे, असे पवार यांनी सांगितले.

अध्यक्षांनी निर्णय घेण्यास लावले चार वर्ष

एका राज्यात पक्षाने दिलेला विधानसभा अध्यक्षांसह सर्व आमदारांनी नाकारला होता. त्यामुळे संबंधित पक्षाने कारवाई करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. पण अध्यक्षांनी सुनावणी घेणे, नोटीस देणे याप्रक्रियेत निर्णय घेण्यासाठी चार वर्ष लावली. तो पर्यंत त्या विधानसभेचा कार्यकाल संपला होता, अशी आठवण पवार यांनी सांगत विधानसभा अध्यक्षांचे महत्त्व अधोरेखित केले.

बुलेट

- राज्यपालांनी मंत्रिमंडळाने शिफारस केलेले १२ विधानसभेच्या आमदारांचा निर्णय घेतला नाही.

- सरकार बदलल्यानंतर निर्णय लगेच घेतील. त्यावरून त्यांची भावना निरपेक्ष नव्हती हे स्पष्ट होईल.

- एकनाथ शिंदे यांनी चुकीच्या पद्धतीने शपथ घेतली पण त्यावर राज्यपालांनी हरकत घेतली नाही.

- २०१९ मध्ये चुकीच्या पद्धतीने शपथ घेतल्याने आमदाराला पुन्हा शपथ घ्यायला लावली होती.

- मी अनेकदा शपथ घेतली पण राज्यपालांनी पुष्पगुच्छ दिला, पेढा भरविला यापूर्वी कधीही पाहिले नाही.

- काँग्रेसमधील एक गृहस्थ भाजपमध्ये गेले पण त्यांना आता शांत झोप लागते. नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका

Web Title: Shivsena Whip Rebel Is Blown Role Of The President Is Important Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top