शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पिंपरी - महापालिकेतर्फे बिजलीनगर येथील उद्यानात शिवसृष्टी आणि पिंपरी गावातील उद्यानात संभाजी सृष्टी साकारण्यात येणार असून, दोन्ही उद्यानांतील कामे प्रगतिपथावर आहेत. जूनअखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत.

महापालिकेच्या बिजलीनगर येथील जुन्या दोन एकराच्या उद्यानामध्ये शिवसृष्टीचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी जवळपास एक कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. नऊ मीटर उंचीचा दीपस्तंभ आणि किल्ल्याच्या तटबंदीसारखे प्रवेशद्वार हे उद्यानाचे वैशिष्ट्य असेल. उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित संकल्प चित्र (म्यूरल्स) बसविण्यात येणार आहे. 

याखेरीज, पिंपरी गावातील जोग महाराज उद्यानात संभाजी सृष्टीचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिवकालीन प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि संभाजी राज्यांच्या जीवनावरील १९ संकल्प चित्रे (म्युरल्स) हे उद्यानाचे वैशिष्ट्य असेल. तसेच उद्यानात वन्यप्राण्यांच्या फायबरच्या प्रतिकृती आणि मुलांसाठी खेळणीही बसविण्याचे प्रस्तावित आहे.  कार्यकारी अभियंता मनोज सेठिया म्हणाले, ‘‘इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उद्यानांतील संकल्प चित्रांचे काम करण्यात येणार आहे. शिवसृष्टी आणि संभाजी सृष्टी ही दोन्ही कामे पाच महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.’’

Web Title: Shivshrusti work progress