
Pune University
Sakal
पुणे : ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांपैकी १४१ महाविद्यालयांची माहिती अद्ययावत होत नसल्याचे आढळून आले. याबाबत विद्यापीठाने नियुक्त केलेल्या समितीने तपासणी केली असता, त्यातील ४९ महाविद्यालये अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले,’’ अशी धक्कादायक माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली. या अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयाची यादीही विद्यापीठाने जाहीर केली असून, उर्वरित महाविद्यालयांची पडताळणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.