

young woman harassed by delivery boy Pune
esakal
Pune Woman Harassment Case : साहित्याची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका डिलिव्हरी बॉयने तरुणीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, संबंधित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.