- सुनील जगताप
थेऊर - अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गातील मित्राने वारंवार अत्याचार केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली असून, मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकील आला आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली असून, लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.