
माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे रहिवासी असलेल्या महिलेला ब्लॅकमेल करून सामूहिक अत्याचार केल्याचे व तिच्याकडून लाखो रूपयांची खंडणी घेतल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे. विशेषतः या प्रकरणात पिढीत महिलेच्या मदतीने संशयित आरोपांनी पत्रकार मच्छिंद्र टिंगरे यांचा खून करणाचा केलेला प्लॅनही उघड झाला आहे. मागिल साधारणतः दीड वर्षांपासून ( सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४) संबंधित पिढीत महिलेचा अर्थिक व शारिरीक छळ सुरू होता. तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. परिणामी अनेक दिवसांचा हा त्रास असाह्य झाल्याने पिढीत महिलेने बुधवार (ता.९) रोजी रात्री माळेगाव पोलिस ठाण्यात सहा युवकांविरूद्ध फिर्याद दिली.