Crime News: वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा दगडावर डोके आपटून खून करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली.
आंधळगाव : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे घडली. शनिवारी (ता. १६) रात्री सव्वाअकराच्या सुमारास हॉटेल सृष्टी बिअरबार समोर ही घटना घडली.