
Pune Petrol Pump: पेट्रोलमध्ये भेसळ किंवा चुकीच्या रिडिंगनं पेट्रोल भरल्याचे अनेक प्रकार तुमच्या कानावर आले असतील पण चक्क पेट्रोलच्या नावाखाली ८० टक्के पाणी वाहनांमध्ये भरल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. यामुळं पंपावर पेट्रोल भरल्यानंतर लोकांच्या दुचाक्या आणि चार चाकी वाहनं रस्त्यात मध्येच बंद पडत असल्याचं दिसून आलं, त्यामुळंच खरंतर हा प्रकार समोर आला आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.