
पुण्यातील वानवडी परिसरातील जांभुळकर चौकात पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक दरोड्याची घटना घडली. निवृत्त विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या कौशल्या बंगल्यात दोन अज्ञात दरोडेखोरांनी घुसून ४० तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख रक्कम लुटली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.