

Indapur Livestock Rescue: 29 Animals Saved, Three Oxen Dead, Two People Booked
sakal
इंदापूर : पिकअप वाहनातून कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने नेण्यात येणाऱ्या गायी-वासरांची सुटका करत इंदापूर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ३ जर्सी गायी, २६ वासरे व चारचाकी वाहन, असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याव्यतिरिक्त तीन वासरांचा गुदमरून वाहनातच मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर पाहायला मिळाले. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.