Highly Venomous Krait
sakal
पुणे
Patas News : दांपत्याचा मण्यारसारख्या अतिविषारी सापासोबत दुचाकीवरून प्रवास
नशीब बलवत्तर म्हणून टळले पाटसमधील दोघांवरील संकट.
पाटस - अगदी काही अंतरावर जरी साप नजरेस पडला तरी आपला थरकाप उडतो. मात्र, पट्टेरी मण्यारसारख्या अतिविषारी सापासोबत दुचाकीवरून प्रवास करण्याचा योग आला तर..? ही कल्पनाच काळजाचे ठोके चुकविल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हा प्रसंग अनुभवला आहे खोमणे दांपत्याने... त्यांनी सापासोबत तब्बल तेरा किलोमीटरपर्यंत दुचाकीवरून प्रवास केला.
