Pune Crime: नारायणगाव बसस्थानकात धक्कादायक चोरी; महिलेच्या पर्समधून २० तोळे सोन्याचे दागिने लंपास, चोरट्यांची चलाखी!

police investigating CCTV footage Narayangaon theft case: गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असताना महिलेच्या खांद्यावरील पिशवीची चैन उघडून १६ लाख ९४ हजारांचे २० तोळे सोन्याचे दागिने लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू
Crowd Chaos Exploited: Major Jewellery Theft Reported in Narayangaon

Crowd Chaos Exploited: Major Jewellery Theft Reported in Narayangaon

esakal

Updated on

-रवींद्र पाटे

नारायणगाव: एस टी बस मध्ये प्रवेश करत असताना गर्दीचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्यांनी महिलेच्या खांद्यावर अडकवलेल्या पिशवीतील सुमारे वीस तोळे वजनाचे १६ लाख ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी दुपारी नारायणगाव बसस्थानकात घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com