बारामतीत कायदा आणि सुव्यवस्था कायम राहायलाच हवी, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कायम आग्रह असतो. त्या पार्श्वभूमीवर पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
बारामती : शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानजीक (Ahilyadevi Holkar Government Medical College) असलेल्या एका हॉटेलमध्ये एका युवकाला दोन ते तीन जणांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांत संतापाची लाट उसळली.