esakal | पावसातही पिंपरी बाजारपेठ गजबजली
sakal

बोलून बातमी शोधा

shopping for ganesh festival in pimpri

पावसातही पिंपरी बाजारपेठ गजबजली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: शहर व परिसरात रविवारी (ता. 1) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. सुटीचा दिवस असल्याने गणेश प्रतिष्ठापनेसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये पाऊस असतानाही खरेदीचा उत्साह कायम होता. 

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस शनिवारी (ता. 31) व रविवारी पुन्हा सुरू झाला. रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस होता. तरी गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. अनेकांनी पावसात भिजत खरेदी केली. दिवसभर खरेदी आणि सायंकाळी सजावट करून सोमवारी (ता. 2) सकाळी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचे अनेकांनी नियोजन केले. 

रस्ते झाले निसरडे 
पावसाने विश्रांती घेतल्याने रस्ते कोरडे पडले होते. त्यामुळे रस्त्यालगत धूळ साचली होती. मात्र, पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने रस्त्यालगत चिखल तयार झाला असून, काही ठिकाणी रस्ता चिखलमय झाल्याने रस्ते निसरडे होऊन काही ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. 

पाण्याचे डबके, दलदल 
पिंपरीतील भाजी मंडईसह चौकात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबकी साचली होती. तसेच, काही ठिकाणी दलदलही निर्माण झाली होती. यातून पायी चालताना नागरिकांना कसरत करावी लागत होती. 

रेनकोट नसल्याने धांदल 
सकाळी पावसाला जोर नसल्याने अनेक जण छत्री, रेनकोट न घेता घराबाहेर पडले. मात्र, नंतर पाऊस कमी-जास्त होत असल्याने अनेकांची धांदल उडाली. रेनकोट नसल्याने अनेक दुचाकीस्वार झाडाखाली तसेच पुलाखाली थांबलेले दिसून आले. 
 

loading image
go to top