esakal | पुणे शहरातील दुकाने १४ एप्रिलपर्यंत बंदच; व्यापारी महासंघाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Shops in Pune closed till April 14 Decision of the Federation of Traders

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बरोबर झालेल्या बैठकीत महासंघाच्या संलग्न संस्थांचे १५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. महासंघाच्या बैठकीत ४६ संलग्न संस्थांपैकी अनेक संस्थांनी दुकाने उघडण्याचा आग्रह धरला होता तर काही संघटनांनी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका मांडली होती.

पुणे शहरातील दुकाने १४ एप्रिलपर्यंत बंदच; व्यापारी महासंघाचा निर्णय
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे  : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे १४ एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. राज्य सरकारने पूर्ण लॉकडाउन केल्यास त्याला सहकार्य करण्याचीही तयारी महासंघाने दर्शविली आहे. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुणे व्यापारी महासंघाने सुरुवातीला त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. परंतु महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या बरोबर रविवारी बैठक झाली. त्यात त्यांनी शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडचे चित्र समोर मांडले. तसेच दुकाने बंद ठेवण्याची ही आवाहन केले. या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य व्यापारात बरोबर मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली होती.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बरोबर झालेल्या बैठकीत महासंघाच्या संलग्न संस्थांचे १५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. महासंघाच्या बैठकीत ४६ संलग्न संस्थांपैकी अनेक संस्थांनी दुकाने उघडण्याचा आग्रह धरला होता तर काही संघटनांनी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका मांडली होती.

''पुणे शहर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे, तसेच सोमवारीही बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिलनंतर राज्य सरकारने पूर्ण लॉकडाउन केल्यास त्याला महासंघातर्फे सहकार्य केले जाईल. परंतु, अंशतः लॉकडाउन केल्यास त्याला महासंघाचा विरोध असेल. तसे झाल्यास पुढील भूमिका १४ एप्रिलला ठरविली जाईल.''
- अॅड. फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​