कोथरूडमधले व्यावसायिक म्हणताहेत, दुकान उघडले पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

कोथरुडमधील सुतार दवाखाना, गुजराथ कॉलनी, पौडरस्ता आदी भागात नागरिकांची वर्दळ असल्याचे चित्र होते.

une-news">पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्र वगळून पुणे शहरातील इतर भागात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज कोथरुडमधील सुतार दवाखाना, गुजराथ कॉलनी, पौडरस्ता आदी भागात नागरिकांची वर्दळ असल्याचे चित्र होते. तरीसुध्दा दुकानदारांच्या अपेक्षे प्रमाणे ग्राहक येत नसल्याचे दिसले.

....म्हणून यूपीतील चित्रकुट येथील महिलेने पुणेकरांचे मानले आभार

पौडरस्त्यावरील वनाज येथे असलेल्या फोटो फ्लॅश कलर लॅब आणि स्टुडीओचे संचालक संतोष कडू म्हणाले की, गेले दोन महिने कोरोनामुळे व्यवसाय बंद आहे. दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, वीज बील असा एक ना अनेक खर्चाचा भार आहे. आज आम्ही फोटोचे दुकान उघडले पण म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. कुटूंबातील मयत व्यक्तींचे फोटो मोठे करणे व पासपोर्ट साईजचे फोटो काढणे यासाठी एखादे दुसरे ग्राहक आले. आता पुन्हा अशा पध्दतीने दुकाने बंद करण्याची वेळ येवू नये हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे.

हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 

कोथरुडमधील पिटर इंग्लड शोरुमचे संचालक तिडके यांनी सांगितले की, महानगरपालिकेने परवानगी दिली असली तरी कंपनीने आम्हाला काही काळ वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. सरकारचे सर्व नियम व सुचनांचे पालन करुन लवकरच व्यवसाय सुरु करण्यात येईल.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सुयोग केश कर्तनालयचे नितीन चव्हाण म्हणाले की, आमच्या विवेकानंद चौकात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची रोज मोठी गर्दी असते. पण गेली दोन महिने आमचे दुकान बंद आहे. ग्राहक येतात, फोन करतात परंतु आम्ही नम्रपणे नकार देतो. आमचे हातावर पोट आहे. कर्जाचा लोड झालाय. पण सांगता कोणाला. कोथरुड ग्रीन झोन मध्ये आहे. दुकान उघडायला हरकत नाही असे काहींनी आम्हाला सांगितले परंतु आपले पुणे शहर रेड झोन मध्ये असल्यावर आमचे दुकान कसे उघडता येईल. आमच्या मनात सरकारी आदेशाबद्दल संभ्रम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shops start in kothrud