esakal | दक्षिण मुख्यालयातर्फे लघुपट व चित्रकला ऑनलाइन स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण मुख्यालयातर्फे लघुपट व चित्रकला ऑनलाइन स्पर्धा

दक्षिण मुख्यालयातर्फे लघुपट व चित्रकला ऑनलाइन स्पर्धा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विजय दिनानिमित्त दक्षिण मुख्यालयाच्या वतीने नागरिकांसाठी लघुपट व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही ऑनलाइन स्पर्धा सर्वांसाठी खुली असून भाग घेणाऱ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत साकारलेली चित्रकला आणि लघुपट पाठवता येतील.

या स्पर्धेसाठी ‘इंडियन आर्मी : नो चॅलेंज टू बिग’ हा विषय ठेवला आहे. लघुपट केवळ ५ मिनिटांचे असणे आवश्‍यक आहे. स्पर्धेचा निकाल विजय दिनादिवशी म्‍हणजेच १६ डिसेंबरला जाहीर करणार आहे.

इच्छुकांना संबंधित व्हिडिओ व चित्रकलेचे छायाचित्र काढून sccomp87@gmail.com यावर पाठविता येतील. तसेच, स्पर्धेबाबतच्या माहितीसाठी दक्षिण मुख्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजला भेट द्यावी.

loading image
go to top