'निकाल लागणार तरी कसा?' शार्टफिल्ममधून दिले शिक्षकांनी उत्तर

The short film by the teachers about How to get results at Home in lockdown
The short film by the teachers about How to get results at Home in lockdown
Updated on

पुणे : लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी निकालाची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मग हा निकाल लागणार तरी कसा ? या प्रश्नाच्या उत्तरासह आपल्या शाळेची आणि शिक्षकांची भेट घडवून आणणारा लघुपट कर्वे रस्ता येथील अभिनव विद्यालय हायस्कूल मराठी माध्यममधील शिक्षकांनी तयार केला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'स्टे होम स्टे सेफ' हा संदेश अनोख्या पध्दतीने देणारा लघुपट तयार केला आहे. शिक्षिका वंदना आणेकर यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने हा लघुपट तयार केला आहे. 'लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचा निकाल कसा द्यायचा', या बाबतीत लघुपटात मनोरंजक पद्धतीने उपाय सुचविला असून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

'बग स्निफर': वेगाने बॅक्टेरिया शोध घेणारे यंंत्र ; पुण्यातील 'या' स्ंस्थेने केली निर्मिती

या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन वंदना आणेकर यांनी केले असून या शाळेचा विद्यार्थी असलेल्या वंश आणेकर याने या लघुपटाचे संपादन केले आहे. वंश याने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. यात शिक्षकांनी आपापल्या भूमिकांचे आपापल्या घरीच चित्रीकरण केले आहे. या लघुपटात मुख्याध्यापक नंदकिशोर नगरकर, पर्यवेक्षक विजयसिंह राजपूत, गायत्री गायकवाड, शोभा पांचाळ यांसह अन्य शिक्षक यात सहभागी झाले असून त्यांनी 'स्टे होम स्टे सेफ' संदेश दिला आहे.

Corona Virus : डॉक्टरांच्या प्रयत्नातून थ्रीडी प्रिंटेड एन 95 मास्कची निर्मिती; निर्जंतुकीकरण करुन होतोय पुर्नवापर

"मी काही लघुपटांचे संपादन यापूर्वी केले आहे. शाळेचा लघुपट मी फिल्मोरा या अॅपच्या सहाय्याने संपादित केला आहे. अशाप्रकारचे फिल्म एडिंग मी यु-ट्यूब आणि ऑनलाइन द्वारे शिकलो आहे."
- वंश आणेकर, विद्यार्थी

पुण्यात भाजीपाला पुरवठ्याबाबत महत्वाची बातमी: वाचा सविस्तर...

"शिक्षकांनी आपापल्या घरात राहूनच लघुपटासाठी चित्रीकरण केले आहे. त्यानंतर त्यांचे संपादन करण्यात आले. विशेष म्हणजे हा लघुपट यू-ट्यूबवर अपलोड केल्यानंतर सध्या परदेशात स्थायिक असणाऱ्या शाळेतील माजी विद्यार्थांनी खुप चांगला प्रतिसाद दिला आहे. जर्मनीतून रेणुका गुमास्ते हिच्यासह अन्य माजी विद्यार्थ्यांनी शाळेची आठवण झाल्याचे आवर्जून सांगितले."
- वंदना आणेकर, शिक्षिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com