आंबेगाव कृषी विभागात कर्मचा-यांची वानवा

नवनाथ भेके
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

निरगुडसर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आंबेगाव तालुक्यातील कृषी विभागात कर्मचा-यांची वानवा असुन तालुक्यात जवळपास ३१ पदे रिक्त आहेत त्यामुळे उपलब्ध कृषी कर्मचा-यांची धावपळ उडत आहे. तसेच तालुक्यात निरगुडसर कृषी मंडळात सर्वाधिक सात कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असुन तब्बल २८ गावांचा भार अवघ्या ४ कृषीसहाय्यक सांभाळत आहे.

निरगुडसर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आंबेगाव तालुक्यातील कृषी विभागात कर्मचा-यांची वानवा असुन तालुक्यात जवळपास ३१ पदे रिक्त आहेत त्यामुळे उपलब्ध कृषी कर्मचा-यांची धावपळ उडत आहे. तसेच तालुक्यात निरगुडसर कृषी मंडळात सर्वाधिक सात कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असुन तब्बल २८ गावांचा भार अवघ्या ४ कृषीसहाय्यक सांभाळत आहे.

आंबेगाव तालुक्यात मंचर, निरगुडसर, घोडेगाव, डिंभे अशी एकुण चार मंडळ कृषी कार्यालय आहेत. या कार्यालयात एकुण ८४ अधिकारी कर्मचारी संख्या आहे. यामध्ये ३१ पदे रिक्त आहेत. त्यातील काही पदे अनेक वर्षापासुन रिक्त आहेत. शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याचे व राबवण्याचे काम ख-या अर्थाने क्षेञीय स्तरावरील कृषीसहाय्यक हे करत असतात. परंतु या स्तरावर काम करणा-या कृषीसहाय्यकांची संख्या अपुर्ण असुन तालुक्यात एकुण ४९ जागांपैकी १५ जागा रिक्त आहेत. अशाच प्रकारे कृषी अधिकारी १, मंडळ कृषी अधिकारी २, कृषी पर्यवेक्षक १, कृषीसहाय्यक १५, लिपिक २, अनुरेखक ४, शिपाई ४ आदी दोन संवर्गातील पदे रिक्त आहेत अशी एकुण ३१ पदे तालुक्यात रिक्त आहेत.

तालुक्यात कृषी विभागातील अपु-या पदसंसख्येमुळे शेतक-यांना शेतीविषयक योजना व पिकविषय मार्गदर्शन करण्यास उपलब्ध कृषी कर्मचा-यांची तारांबळ होताना दिसत आहे त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

२८ गावांचा भार अवघ्या ४ कृषीसहाय्यकांवर...
निरगुडसर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत २८ गावे येतात, या गावांचा कार्यभार अवघ्या ४ कृषी सहाय्यकांच्या खांदयावर आहे. त्यामुळे या कृषीसहाय्यकांची मोठी धावपळ होत आहे. या मंडळात एकुण कृषीसहाय्यकांची ७ पदे रिक्त आहेत तसेच दीड वर्षापासुन मंडळ कृषी अधिकारी पद रिक्त आहे. अनुरेखक १ व शिपाई १ अशी पदे रिक्त आहेत. या गावांमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान,उन्नत शेती अभियान, जलयुक्त शिवार, फळबाग, कांदा चाळी आदी महत्वपुर्ण शेतक-यांच्या हिताच्या योजनांची मागणी या मंडळात अधिक प्रमाणात असते.त्यामुळे याठिकाणी रिक्त असणारी कृषीसहाय्यकांची पदे शासनाने तातडीने भरावी अशी मागणी निरगुडसर गावचे माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shortage of employees in ambegav krushi sector