esakal | इंदापुर तालुक्यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडाः नातेवाईक त्रस्त

बोलून बातमी शोधा

Shortage of remedivir injection in Indapur taluka

रुग्नालयांमध्ये रुग्नास बेड उपलब्ध होत नाही, रुग्नांना औषधे मिळत नाहीत अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे रुग्न व नातेवाईक घाबरुन गेले आहे. कोरोनावर रामबाण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.

इंदापुर तालुक्यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडाः नातेवाईक त्रस्त
sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : ''सध्या इंदापुर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्न आढळुन येत आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच रुग्नालयेही रुग्नांनी भरलेली आहे. कोरोनावर रामबाण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचाही तुटवडा भासत असल्यामुळे रुग्न व नातेवाईक त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने 
कोरोनावरील औषधे उपलब्ध करुन द्यावीत'' अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष व मदनवाडी(ता.इंदापुर) गावचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी केली आहे.

याबाबत भाजपा युवा मोर्चाचे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष व मदनवाडी(ता.इंदापुर) गावचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे यांचेकडे निवेदनाद्वारे कोरोनावरील औषधे उपलब्ध करुन 
देण्याची मागणी केली आहे. याबाबत तेजस देवकाते यांचे निवेदनानुसार सध्या इंदापुर तालुक्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. 

बारामती : विशेष समिती सोडणार रेमडेसेविरच्या तुडवड्याची समस्या; रुग्णांचे हाल थांबणार! 

रुग्नालयांमध्ये रुग्नास बेड उपलब्ध होत नाही, रुग्नांना औषधे मिळत नाहीत अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे रुग्न व नातेवाईक घाबरुन गेले आहे. कोरोनावर रामबाण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे नातेवाईकांना बारामती, पुणे आदी ठिकाणी औषधांच्या दुकानांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. अनेकदा औषधे उपलब्ध असून त्याचा काळा बाजारही मोठ्या प्रमाणात होत आहे.

''कोरोनामुळे आधीच नागरिक त्रस्त आहे त्यातच औषधांचा तुटवडा व काळा बाजार यामुळे आणखीनच भर पडली आहे. प्रशासनाने याबाबीकडे  गांभार्याने लक्ष देऊन तातडीने रेमडेसिव्हीर इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध करुन देऊन दिलासा दयावा'' , अशी अपेक्षा आहे.

कोरोनाच्या बिकट परिस्थीतही नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार

याबाबत तेजस देवकाते म्हणाले, ''आधीच जनता कोरोनामुळे धास्तावलेली आहे. त्यातच औषधांचा तुटवडा यामुळे रुग्नांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने औषधे उपलब्ध करुन दिली पाहिजे व काळा बाजार रोखला पाहिजे.''