Pune News : कॅब कंपन्यांनी अ‍ॅपवर शासकीय दर दर्शवावे; महाराष्ट्र कामगार सभेची मागणी

अ‍ॅप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या कॅब अ‍ॅग्रिगेटर कंपन्यांच्या (उबर, ओला, रॅपीडो) दिशाभूल धोरणांमुळे प्रवासी व चालक यांच्यात वाद निर्माण होत आहेत.
ola uber rapido

ola uber rapido

sakal

Updated on

पुणे - अ‍ॅप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या कॅब अ‍ॅग्रिगेटर कंपन्यांच्या (उबर, ओला, रॅपीडो) दिशाभूल धोरणांमुळे प्रवासी व चालक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. राज्याच्या परिवहन विभागाने अशा कंपन्यांना शासकीय दर अ‍ॅपवर दर्शवावे, अशी सूचना केली. मात्र, कंपन्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. कंपन्यांनी याची दखल घेतली नाही तर ‘ओन्ली मीटर’ ही मोहीम सुरू करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com