

‘श्री दत्त’कडून ५० रुपये प्रमाणे बिल खात्यावर जमा
गणपतराव पाटील यांची माहिती
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त कारखान्याने गळीत हंगाम २०२५ -२६ मध्ये कारखान्याने गळितास उपलब्ध होणाऱ्या उसास हंगामात एक रकमी प्रतिटन ३४५० व सन २०२६ च्या दीपावली पूर्वी उर्वरित प्रति टन ५० रुपये असा एकूण प्रति टन रुपये ३५०० दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे कारखान्याने गळितास उपलब्ध झालेल्या उसास प्रति टन ५० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी दिली.
गळीत हंगाम सन २०२५- २६ मध्ये कारखान्याने ११,७८,७०५ मे. टन उसाचे गाळप केले होते. गाळपास उपलब्ध झालेल्या या उसास हंगाम कालावधीत प्रचलित पद्धतीनुसार एकरक्कमी विना कपात प्रति टन ३४५० प्रमाणे ऊसदर अदा केला होता. हंगाम सुरुवातीस व्यवस्थापनाने जाहीर केल्याप्रमाणे आता प्रति टन रुपये ५० प्रमाणे रुपये ५ कोटी ८९ लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. गळीत हंगाम सन २०२६-२७ करिता कारखान्याने १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पिकविलेला व कारखान्याकडे नोंदविलेला सर्व ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी केले.
या वेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र फाटक, संचालक अनिलराव यादव, प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, भैय्यासाहेब पाटील अन्य संचालक कार्यकारी संचालक संजीव देसाई व खाते प्रमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.