Shri Chhatrapati Sugar Factory employee celebration
sakal
वालचंदनगर - भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या करारानूसार १० टक्के वेतनवाढ दिली असून वेतनवाढीचा पहिला पगार कामगारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. वेतनवाढ देणारा छत्रपती राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरला असून छत्रपती च्या कामगारांनी फटाके फोडून,गुलाब उधळत पेढू वाटून जल्लोष केला.