
श्री राम मित्र मंडळ ट्रस्टची स्थापना 1997 मध्ये झाली.
मंडळ आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजाशी जोडलेले आहे.
हे मंडळ उत्सवापलीकडे जाऊन समाजोपयोगी कार्य करणारे आदर्श मंडळ आहे.
Shriram Mitra Mandal: समाजातील एकोपा, संस्कृतीचे संवर्धन आणि सेवाभाव या मूल्यांचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर केवळ उपदेशाने भागत नाही. त्यासाठी कृतीतून दाखवावे लागते. श्री राम मित्र मंडळ ट्रस्ट हे अशाच कृतीप्रधान वाटचालीचे उत्तम उदाहरण आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हे मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणत आहे. पण केवळ उत्सवापुरतेच ते थांबले नाही, तर आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत विधायक कार्य त्यांनी केलं आहे.