वडूज संत नरहरी महाराज पुण्यतिथी बातमी

वडूज संत नरहरी महाराज पुण्यतिथी बातमी

Published on

श्री संत नरहरी महाराजांच्या
मंदिराचे वडूजमध्ये भूमिपूजन

वडूज, ता. ८ : येथे श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी झाली. यावेळी श्री संत नरहरी महाराज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
श्री संत नरहरी सोनार सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, भजन, पुष्पवृष्टी आदी कार्यक्रम झाले. त्यानंतर नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी, गणेश गोडसे, नगरसेवक ओंकार चव्हाण, रेश्मा बनसोडे, रेखा माळी, रोषना गोडसे, भाजपचे उपशहर प्रमुख किरण लोहार आदींसह समाज बांधवांच्या उपस्थितीत मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
संत नरहरी सोनार सामाजिक विकास सेवा संस्था व सुवर्णकन्या वेल्फेअर ग्रुपच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमास समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------

V93757
वडूज : श्री संत नरहरी महाराजांच्या मंदिर भूमिपूजनप्रसंगी मान्यवर.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com