Someshwar Sugar Factory : 'सोमेश्वर'कडून राज्यातील आजवरचा सर्वोच्च दर जाहीर; २०२५-२६ हंगामासाठी प्रतिटन ३८०० रूपये

सोमेश्वर कारखान्याने २०२५-२६ या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी तब्बल ३८०० रूपये प्रतिटन असा महाराष्ट्राच्या साखरउद्योगाच्या इतिहासातील आजवरचा सर्वोच्च अंतिम दर केला जाहीर.
Shri Someshwar Sugar Factory

Shri Someshwar Sugar Factory

sakal

Updated on

सोमेश्वरनगर - सोमेश्वर कारखान्याने २०२५-२६ या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी तब्बल ३८०० रूपये प्रतिटन असा महाराष्ट्राच्या साखरउद्योगाच्या इतिहासातील आजवरचा सर्वोच्च अंतिम दर आज जाहीर केला. ही रक्कम एफआरपीपेक्षा ५१५ रूपये अधिक आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ज्यांचा ऊस तुटलाय अशा शेतकऱ्यांना तर अनुदानासह ३९०० व ४००० रूपये प्रतिटन असा विक्रमी दर मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com