

श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे नातेपुतेत स्वागत
नातेपुते, ता. १० : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा मंगळवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील फलटण येथून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली.
नातेपुते येथे डॉ. एम. पी. मोरे यांच्या निवासस्थानी पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेऊन आरती केली.
या प्रसंगी डॉ. एम. पी. मोरे, सौ. नीलम मोरे, रेणुका महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सुचित्रादेवी देशमुख, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नगरसेविका सौ. दीपाली देशमुख, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जप संकुलाचे प्रांत कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, अमरशील देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यानंतर पालखी सोहळा शहरातून वाजतगाजत वालचंदनगर रोडवरील श्रीकांत बाविस्कर यांच्या निवासस्थानी गेला. येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी वालचंदनगर (जि. पुणे) येथे रवाना झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.