Crime News: श्रीरामनगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; बारा तासाच्या आत चौघांना अटक

Shrinath Jewellers Robbery, Rajgad Police, Four Arrested : या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात श्रीरामनगर येथील सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली.
Rajgad Police Arrest Four Suspects Within 12 Hours of an Armed Robbery at Shrinath Jewellers in Shriram Nagar

Rajgad Police Arrest Four Suspects Within 12 Hours of an Armed Robbery at Shrinath Jewellers in Shriram Nagar

sakal
Updated on: 

खेड शिवापूर,: हवेली तालुक्यातील श्रीरामनगर (ता. हवेली) येथील श्रीनाथ ज्वेलर्स या सराफी दुकानावर चार अनोळखी इसमांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी (ता. १६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. बंदुकीसारखे दिसणारे हत्यार आणि कोयत्याचा धाक दाखवून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पाच अंगठ्या घेऊन आरोपी पसार झाले. मात्र १२ तासांच्या आत राजगड पोलिसांनी तपास करुन चार संशयित आरोपींना अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com