पुण्याच्या श्‍वेताची खगोल भरारी

बाबा तारे
शनिवार, 26 मे 2018

औंध - जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्‍वेता कुलकर्णीची केंद्र सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बंगळूर यांनी देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे. खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्षे काम करणारी श्‍वेता ही देशातील सर्वोत्कृष्ट शंभर उद्योजिकांपैकी एक ठरली आहे.

आयआयएम बंगळूरच्या एन. एस. राघवन सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरियल लर्निंग (एनएसआरसीईएल) मार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘वुमन स्टार्टअप प्रोग्रॅम’मध्ये भारतातील सात हजार उद्योजिकांपैकी सर्वोत्कृष्ट शंभर उद्योजिका निवडल्या गेल्या. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडीत महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या दहा सर्वोत्कृष्ट महिलांपैकी पुण्यातून श्‍वेता ही एकमेव महिला आहे. या निवडीनंतर श्‍वेता बंगळूर येथे प्रशिक्षण घेऊन आली आहे. तिला आयआयएम, नागपूर तसेच भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून आर्थिक मदत मिळणार आहे.

ॲस्ट्रो एन स्पेस या श्‍वेताच्या नवीन प्रकल्पांतर्गत ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातून खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोचविण्याचा तिचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे खगोलशास्त्राशी संबंधित काम  करणारी श्वेता ही भारतातील सर्वांत लहान उद्योजिका ठरली आहे. 

मनोरंजनातून खगोलशास्त्र शिकवणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचविणे यावर माझे कार्य सुरू असते. खगोलशास्त्राची माहिती रंजक व कल्पकतेने लोकांपर्यंत पोचविण्यासाठी तज्ज्ञ माझ्यासोबत काम करत आहेत.
- श्‍वेता कुलकर्णी, खगोल संशोधक

Web Title: shweta kulkarni astronomy motivation