

Pimpalgaon celebrates Siddharth Bangar’s Indian Army selection with a grand musical procession and community honor.
Sakal
मंचर : पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धार्थ रमेश बांगर याची भारतीय सैन्यात निवड झाल्याने गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या होतकरू युवकाने मिळविलेल्या यशाचा आनंद गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. त्यानिमित्ताने गावातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आले. येथील शेतकरी रामदास गंगाराम बांगर यांचा सिद्धार्थ नातू आहे.त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पिंपळगावात झाले.देश सेवा करण्याची त्याची जिद्द होती.