Pune News : २३ गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे; सिद्धार्थ शिरोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Shirole demand Planning should handed over to Municipal Corporation for development of 23 village politics

Pune News : २३ गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे; सिद्धार्थ शिरोळे

पुणे : महापालिका हद्दीतील २३ गावांना सोयी-सुविधा पुरविणाऱ्या पुणे महापालिकेलाच स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी नियुक्त करुन नियोजनाचे अधिकार द्यावेत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत आज (गुरुवारी) केली.

महापालिकेतील २३ गावांच्या समावेशाबाबत लक्षवेधी सूचना आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी भाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश जेव्हा करण्यात आला त्यावेळेस तत्कालीन महा विकास आघाडी सरकारने पीएमआरडीएला स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी म्हणून नियुक्त केले होते.

परंतु या २३ गावांमध्ये सर्व सोयी-सुविधा पुणे महानगरपालिका पुरविते आणि महसूल मात्र पीएमआरडीए वसूल करते. याकरिता पीएमआरडीए ऐवजी सोयी-सुविधांची कामे करणाऱ्या पुणे महानगरपालिकेलाच नियोजनाचे अधिकार देऊन स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे यावेळी केली.