

Siddhi Jain NDA Bronze Medal
Sakal
पुणे : ‘एनआयटी’मध्ये मिळालेला प्रवेश बाजूला सारत, हवाई दलाचे स्वप्न मनाशी बाळगलेल्या सिद्धी जैनने घेतलेला मोठा निर्णय आज इतिहास ठरला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवणारी सिद्धी रविवारी (ता. ३०) १४९ व्या अभ्यासक्रमात ‘राष्ट्रपती कांस्यपदक’ मिळविणारी देशातील पहिली महिला छात्र ठरली. त्यासोबतच तिला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू एअर कॅडेटचा मानही मिळाला.