esakal | Coronavirus : निर्जन रस्त्यावर माणुसकीचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Samir-Badgujar

शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले.. घरातच माणसे अडकून पडली.. हातावरचे पोट असलेल्या लोकांना उपाशी रहावे लागत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड मधील काही मित्रमंडळी एकत्र येऊन घरोघरी जात त्यांना जगण्यासाठी आधार देत आहेत.

Coronavirus : निर्जन रस्त्यावर माणुसकीचे दर्शन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले.. घरातच माणसे अडकून पडली.. हातावरचे पोट असलेल्या लोकांना उपाशी रहावे लागत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड मधील काही मित्रमंडळी एकत्र येऊन घरोघरी जात त्यांना जगण्यासाठी आधार देत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

करोनाच्या प्रकोपामुळे शहरे ठप्प झाली. उद्योगधंदे बंद पडले. मात्र, त्याने, रोज मिळेल ते काम करून भाकरीचा चंद्र शोधणारी कुटूंबे उपाशी पोटी राहत आहेत. तर काहींना अर्धपोटी दिवस काढावे लागत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील काही लोक या कुटूंबांना जगण्याचे बळ देत आहेत. पिंपरी चिंचवडमधील समीर बडगुजर आणि त्यांची मित्रमंडळी त्यापैकीच एक आहेत. 

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच!

मागील २ दिवसांपासून समीर आणि त्यांचे बंधू सर्फराज बडगुजर हे त्यासाठी धडपडत आहेत. त्यांचे मित्र असद खान, अश्रफ खान, कामरान खान, चेतन बोरकर, किरण पुजारी, शोेएब अन्सारी यांनी स्वतः वर्गणी काढून दीड लाख रुपये उभारले. त्यातून ते उपाशी कुटूंबांना ५ किलो तांदूळ आणि एकेक किलो पोहे, डाळ, जेमिनी तेल, साखर तसेच मसाले व बिस्किटे देत आहेत. त्यांनी आतापर्यंत मोरवाडी, नेहरूनगर, निगडी, मोरेवस्ती, चिंचवड भागातील २०० कुटूंबांना या प्रकारे विनामूल्य मदत केली आहे. बडगुजर यांचा तळवडे, चाकण येथे रबराचा व्यवसाय आहे. 

'धान्य देत असताना आम्हाला ३ दिवसांपासून उपाशी असलेली कुटूंबेही दिसली. मात्र, आमची मदत अपुरी पडत आहे. काही कुटुंबांकडे अन्न शिजवण्याची व्यवस्था नाही. बरेच लोक रस्त्यावर ही दिसत आहेत. त्यामुळे, आम्ही आता इथून पुढे रोज ३० किलो मसाले भात वाटणार आहोत.'
- समीर बडगुजर

loading image
go to top