esakal | भराडी येथे बिबटयांचे होतेय दिवसाही दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

The sighting of leopards at Bharadi on Sunday morning has created an atmosphere of fear in the area.jpg

रविवारी सकाळी पावणेसात वाजता खडकी-भराडी गावच्या शिवेवर असणा-या बांगरवस्तीकडे दुधसंकलन करण्यासाठी चारचाकी पिकअप गाडीतून शुभम बांगर, गोपीनाथ सरवदे व अकबर तांबोळी हे तिघेजण जात होते. त्यावेळी अचानक ऊसाच्या शेतातून निघालेला बिबटया रस्त्यावर अवतरला.

भराडी येथे बिबटयांचे होतेय दिवसाही दर्शन

sakal_logo
By
नवनाथ भेके

निरगुडसर : भराडी (ता.आंबेगाव) येथील बांगरमळ्यात रविवार (ता.१५) रोजी एक बिबटया चक्क सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर अवतरला. सकाळी दुधसंकलन करणारी चारचाकी गाडी समोर दिसताच बिबटयाने ऊसाच्या शेतात धूम ठोकली. दिवसाढवळया बिबटया फिरु लागल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तरी परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

रविवारी सकाळी पावणेसात वाजता खडकी-भराडी गावच्या शिवेवर असणा-या बांगरवस्तीकडे दुधसंकलन करण्यासाठी चारचाकी पिकअप गाडीतून शुभम बांगर, गोपीनाथ सरवदे व अकबर तांबोळी हे तिघेजण जात होते. त्यावेळी अचानक ऊसाच्या शेतातून निघालेला बिबटया रस्त्यावर अवतरला. परंतु चारचाकी गाडी पाहताच बिबटयाने दुस-या ऊसाच्या शेतात धूम ठोकली. मागील महिन्यातही याच वस्तीवर पप्पु खिलारी हे दुपारी चार वाजता ट्रॅक्टरमधून आणलेले खत शेतात खाली करुन परतत असताना बिबटयाने त्यांचा रस्ता अडवला होता.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यावेळी ती मादी होती व तिच्या सोबत दोन पिल्लेही होती. मग त्या शेतक-याने आपला मार्ग बदलून प्रवास केला. तसेच मनोहर अरगडे व वैभव खिलारी यांनाही बिबटया राञीच्या वेळी गाडीला आडवा झाला. परंतु गाडीच्या प्रकाशझोतामुळे बिबटयाने धूम ठोकली. मागील दोन महिन्यात बिबटयाने येथील वस्तीवर धनगरांच्या वाडयावर हल्ले करुन मेंढया व शेळ्यांचा फडशा पाडला आहे 
   
बांगरवस्ती परिसरात बिबटया नर व मादी पिल्लांसह असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. बिबटयाचे दिवसाही दर्शन होत असल्याने बांगरवस्तीसह भराडी व खडकी परीसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहे. बिबटया पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी वैभव खिलारी, मनोहर अरगडे यांच्यासह नागरीकांनी केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image