ममता सिंधुताई कोरोना पॉझिटिव्ह | Mamata SindhuTai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mamta Sindhutai

ममता सिंधुताई कोरोना पॉझिटिव्ह

पुणे - पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई यांची कोरोना टेस्ट (Corona Test) पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत त्यांनी फेसपुक पोस्ट (Face Book Post)करत माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ममता सिंधुताई यांनी केले आहे. सिंधुताई यांच्या अंत्यसंस्कारावेळी शहरातील अनेक राजकीय नेते, नागरिक, सामाजिक कार्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, आता ममता सिंधुताई यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (Sindhutai Sapkal Daughter Mamta Sindhutai Tested Positive )

हेही वाचा: अमृता फडणविसांचा विद्या चव्हाणांवर मानहानीचा दावा

सुमारे दीड महिन्यांपूर्वी सिंधूताई (Sindhutai Sapkal) यांना हार्नियाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आजारावरील उपचारासाठी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार चालूच होते. मात्र मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उपचार चालू असतानाचा त्यांना ह्रदयविकाराचा (Heart attack ) तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधूताई यांच्या पार्थिवावर पुण्यातील ठोसर पागा येथे महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top