पुणे जिल्ह्यातील सिंगापूर राहणार 5 दिवस बंद!

Pune_Lockdown
Pune_Lockdown
Updated on

गराडे : सिंगापूर (ता. पुरंदर) येथे नुकताच एक रुग्ण सापडल्यामुळे गावात तातडीने औषध फवारणी करून घेण्यात आली. तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळावा व रुग्णांची साखळी तुटावी यासाठी सर्वानुमते गाव बंदीचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य दशरथ लवांडे यांनी दिली.

सरपंच रामदास उरसळ, उपसरपंच स्वाती आबा कोरडे, ग्रामसेविका मीरा होले तसेच सर्व सदस्य यांनी हा निर्णय घेऊन तहसीलदार रुपाली सरनोबत यांना कळविला.

गावात अत्यावश्यक सेवा ही दिवसभर चालू राहील. तर सकाळी नऊ वाजेपर्यंत दूध विक्री चालू ठेवण्यात येणार आहे. गावाचा पूर्ण सर्वे झाला असून, बफरझोनमध्ये गावे टाकण्यात आली आहेत. संपर्कातील 18 जणांचे स्वॅब उद्या घेतले जातील, असे ग्रामसेविका मीरा होले यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकांनी कोरोना व्हायरसची साखळी तुटावी. यासाठी शासनाला सहकार्य करून बंद पूर्णपणे पाळावा असे आवाहन सरपंच रामदास उरसळ व पोलिस पाटील यादवेंद्र उरसळ यांनी केले.

(Edited By : Krupadan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com