शालेय क्रिकेट १७ मुले

शालेय क्रिकेट १७ मुले
Published on: 

सिंहगड सिटी स्कूलचा ४१ धावांनी विजय
शालेय क्रिकेट सतरा वर्षांखालील मुले
पुणे, ता. ८ ः शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित सतरा वर्षांखालील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धेत सिंहगड सिटी स्कूलने क्रूट मेमोरिअल स्कूलचा ४१ धावांनी पराभव केला.
वाडिया कॉलेजच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सिंहगड सिटी स्कूलने २ बाद ६३ धावा केल्या. यावेळी समर्थ घुलेची खेळी उपयुक्त ठरली. क्रूट मेमोरिअल स्कूलला ८ बाद २२ धावा करता आल्या. दीपक थोपटे व रुगबीरसिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या लढतीत विस्तारा वर्ल्ड स्कूलने ऑक्सफर्ड वर्ल्ड स्कूलचा ३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विस्तारा वर्ल्ड स्कूलने बिनबाद ७४ धावा केल्या. यावेळी रोनित शेळके व वेदांत तिरकुडेची नाबाद खेळी उपयुक्त ठरली, तर ऑक्सफर्ड वर्ल्ड स्कूलला ३ बाद ३७ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक ः
१) सिंहगड सिटी स्कूल- (६ षटकांत) २ बाद ६३ (समर्थ घुले ३१, अर्थव १-०) विजयी विरुद्ध क्रूट मेमोरिअल स्कूल- (६ षटकांत) ८ बाद २२ (दीपक थोपटे २-३, रुगबीरसिंग २-३)
२) विस्तारा वर्ल्ड स्कूल- (६ षटकांत) बिनाद ७४ धावा (रोनित शेळके नाबाद २७, वेदांत तिरकुडे नाबाद १६) विजयी विरुद्ध ऑक्सफर्ड वर्ल्ड स्कूल- (६ षटकांत) ३ बाद ३७ (अर्णव शिंदे १-०, अर्थव चट्टे १-१०)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com