

Sinhagad cleanliness drive led by MP Nilesh Lanke; Aapla Mavla campaign
Sakal
किल्ले सिंहगड : सिंहगड किल्ल्यावर ‘आपला गड, आपली जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “गड-किल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. मी खासदार म्हणून नव्हे, तर शिवरायांचा मावळा म्हणून या मोहिमेत सहभागी आहे,” असे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले.