सिंहगडावरील हत्तीटाक्यात बुडून सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

सिंहगडावरील हत्तीटाक्यात बुडून सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सिंहगड: सिंहगडावरील हत्ती टाक्यात सहलीसाठी आलेला इयत्ता बारावीचा विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहिद मुल्ला असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकत होता. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेत दुर्दैवाने संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सिंहगडावरील रहिवासी व व्यावसायिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत शाहिदला पाण्यातून बाहेर काढले.

मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलचे इयत्ता बारावीचे साठ विद्यार्थी व चार शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते. देवटाके व लागूनच असलेल्या हत्ती टाके परिसरात असताना शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरला व तो थेट हत्तीटाक्याच्या पाण्यामध्ये पडला. अमोल पढेर,विठ्ठल पढेर,आकाश बांदल,विकास जोरकर, ओंकार पढेर,सूरज शिवतारे,पवन जोरकर, सुग्रीव डिंबळे, तुषार डिंबळे, शिवाजी चव्हाण, रामदास बांदल, राजू सोनार व इतर हॉटेल व्यावसायिकांनी ताबडतोब पाण्यामध्ये उड्या घेऊन शाहिद चा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून येत नव्हता. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्थानिकांनी शाहिद मुल्ला यास पाण्यातून बाहेर काढले.

जोरदार पाऊस सुरू असल्याने देवटाके पूर्ण भरलेले आहे, त्यामुळे शाहिदचा शोध लागण्यास उशीर झाला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आहे. विद्यार्थ्यांसोबत आलेले शिक्षक व विद्यार्थी आकस्मिकपणे घडलेल्या या प्रकारामुळे घाबरून गेले होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती देण्यात आली होती परंतु अग्निशमन दल घटनास्थळी येण्याच्या अगोदर स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Web Title: Sinhagad Death Of A Student Elephant Tank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..