Sinhagad Fort : ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सभापती युवराज काकडे कटिबद्ध; सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

Sinhagad Fort Diwali Celebration and Heritage Conservation : ऐतिहासिक सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाधीस्थळांचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, लाठी-काठी प्रात्यक्षिके आणि शिवव्याख्यानातून शिवशौर्याचा जागर करण्यात आला.
Sinhagad Fort Diwali Celebration and Heritage Conservation

esakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्य व बलिदानाने पवित्र झालेल्या ऐतिहासिक भूमी किल्ले सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.समाधी सुशोभीकरण,पूजन,लाठी-काठी प्रात्यक्षिके आणि शिवव्याख्यान अशा विविध उपक्रमांमुळे दीपावली पाडव्याचा हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला.

Loading content, please wait...