
खडकवासला : सिंहगडावर बुधवारी बेपत्ता झालेला तरुण तब्बल शंभर तासांनी सुखरूप आढळला. गौतम आदिनाथ गायकवाड (वय २४, रा. हैदराबाद, तेलंगण) असे त्याचे नाव असून, आज सायंकाळी सात वाजता सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीमागील परिसरात स्थानिक नागरिकांना तो आढळून आला.