

District Administration Orders Complete Traffic Closure at Sinhagad From Today
Sakal
खडकवासला : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा-२०२६’च्या अनुषंगाने सिंहगड घाट परिसरात सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला.