Pune News | सिंहगडाच्या घाटात दुचाकीने पेट घेतल्याने वाहतूक कोंडी | Bike Catches Fire on Sinhagad Road | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bike Catches Fire on Sinhagad Road

पुणे : सिंहगडाच्या घाटात दुचाकीने पेट घेतल्याने वाहतूक कोंडी

खडकवासला : सिंहगड घाटात अचानक एका दुचाकीला आग लागली. चालक वेळेत बाजूला झाल्याने त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु त्यानंतर दुचाकीची आग रस्त्यालगतच्या गवताला आग लागली. गाडीची आग विझवणे, वाहतूक कोंडी, वणवा विझविण्यासाठी वन सरंक्षण समितीची कर्मचारी यांनी धावपळ झाली. सुरक्षारक्षकांचे खबरदारीमुळे मोठी दुर्घटना टळली. (Bike Catches Fire on Sinhagad Road)

हेही वाचा: 7,200 कर्मचाऱ्यांची पोलीस भरती गृहखातं स्वत:च करणार, घोटाळे टाळण्यासाठी निर्णय

दरम्यान या पेटलेल्या दुचाकीच्या आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्याने घाटात मोठा वनवा लागला. या आगीत घेरा सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल जळाले. आज रविवारची सुट्टी असल्याने सिंहगडला पर्यटकांची मोठी गर्दी असते. दुपारी सिंहगड घाट रस्त्यात एका दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे घाटरस्त्यात मोठा गोंधळाचे वातावरण झाले होते.

घाटात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठीक ठिकाणी वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षक असतात. त्यांना दुचाकीच्या आगीची बातमी समजली. ते सर्वजण घटनास्थळी पोचले. त्यांनी धावपळ करुन घाटातील वाहतुक थांबविली. दुचाकीच्या आग विझविन्याचे काम सुरू केले.

हेही वाचा: Budget 2022: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

त्यांनी ती माहिती वनविभागाचे वनपाल बाबासाहेब लटके, कर्मचारी संदीप कोळी यांना दिली. हे देखील तातडीने या ठिकाणी पोहचले. घाटात वाहने व पर्यटकांना जागोजागी थांबवून या दुर्घटनेत अधिक भर पडु न देण्यासाठी सुरक्षारक्षकांना प्रयत्नांची मोठी पराकष्ठा करावी लागली. घाटातून वनवा मोठ्या प्रमाणावर पसरत गेला.

जोरदार वारा व उंच डोगरकड्याचे परिसरात तो वेगाने पसरत गेला त्यामुळे वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षकांना एकाच वेळी घाटातील परिस्थितीवर आणि वनव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले.आज घटनेमुळे वनविभागाचे घेरा सिंहगड परिसरातील जंगल मोठ्या प्रमाणावर जळाले. वणवा विझवून सुरक्षा रक्षक रात्री उशिरा गोळेवाडीत पोचले.

Web Title: Sinhagad Ghat Stomach Two Wheeler Traffic Jams Due To Taking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top