
सिंहगड रस्ता : येथील बहुचर्चित बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या पुलाच्या उद्घाटनामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच नियोजित वेळेच्या सहा महिने आधी उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.