Drink
sakal
खडकवासला - सिंहगडावर जाणाऱ्या एका खासगी आलिशान वाहनातील चालक व सहकाऱ्यांनी वाहनातच उघडपणे मद्यपान केल्याची घटना रविवारी गोळेवाडी उपद्रव शुल्क नाक्यावर उघड झाली. वन सुरक्षारक्षकांनी वाहन बाजूला घेण्यास सांगूनही चालकाने तेथून पळून जाण्याच्या उद्देशाने वाहन भरधाव पुढे नेले.